आगामी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ आपल्या समोर येत आहे. आपण मला १९९२ ते २०१७ पर्यंत म्हणजे गेली २५ वर्षे आपला लोक प्रतिनिधी म्हणून पुणे महानगरपालिकेत आपल्या परिसरातील प्रश्न सोडविण्यासाठी बहुमतांनी निवडुन दिले त्याबद्दल मी सदैव आपली ऋणी आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत आपल्या प्रभागातून माझा पराभव झाला. उपमुख्यमंत्री ना. श्री. अजितदादा पवार यांनी माझ्यावर व मी करीत असलेल्या सार्वजनिक कामांची दाखल घेवून माझ्यावर विश्वास दाखवून पुणे महानगरपालिकेत स्विकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. त्यांनी दिलेल्या स्वीकृत-नगरसेवक या पदाचा वापर मी 'आपला प्रभाग, आपलं घर' या संकल्पनेतून आपल्या कुटुंबातील एक घटक म्हणून प्रत्येक समस्या प्रामाणिक पणे कार्यक्षमतेने सोडविण्याचा व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न केला.
अजितदादांनी दिलेली जबाबदारी मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने योग्य रितीने पार पाडत आहे. प्रभागातील नागरी प्रश्नांची सोडवणूक तसेच विकास कामे व सामाजिक कामांचे दाखले आता आपल्या परिसरातील नागरीक देत आहे. तसेच नियोजन बध्द विकास कामांमुळे आपल्या परिसराचा कायापालट झाला आहे. येथील प्रशस्त रस्ते, झोपडपट्टीवासीयांसाठी आणि गरीब नागरिकांसाठी बीएसपीयू योजने अंतर्गत सिमेंटची पक्की घरे बांधून दिली. आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सुसज्ज दवाखाना तळजाई वसाहत येथे उभारण्यात आला आहे. शारीरिक आरोग्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली चार क्रीडा संकुले आपल्या प्रभागात उभारण्यात आली आहेत. पुणे शहराचे फुप्फुस असलेल्या तळजाई टेकडीवर १०८ एकर जागा पुणे महानगरपालिकेच्या वतीने भूसंपादन करून तेथे हजारो देशी वृक्ष मी स्वतः राजमंड्री आंध्रप्रदेशात येथे जाऊन आणली व त्यांची लागवड केली निम्या पुणे शहराला पुरेल एवढा प्राणवायू मिळेल असे आपल्या सर्वांना भूषण व अभिमान वाटावा असे उद्यान तळजाई टेकडी येथे उभे केले आहे. तसेच लाईट, पाणी, रस्ते, महिला बचत गटांना उद्योगांसाठी लागणाऱ्या पायाभुत सुविधा निर्माण केल्या आहेत. कामांची यादी मोठी आहे. त्याची माहिती माझ्या कार्य अहवालात मिळेलच व आपणांस देखील माहिती आहे. समाधानी जीवनशैलीत जगण्यासाठीचं प्रसन्न वातावरण यामुळे आपला प्रभाग एक वेगळ्याच उंचीवर पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकांच्या गरजांना व समस्यांना त्यांना भेडसाविणाऱ्या प्रश्नांना प्राधान्य देत कार्यरत राहणे ही माझी कामाची पध्दत आहे. ही कार्यपध्दती अंगी बाळगुन "माझे काम हिच माझी ओळख“ या ब्रीद वाक्यानुसार लोकांना नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात अग्रेसर आहे. कामांचा पाठपुरावा करीत भविष्यातील गरजांचा विचार करित नियोजन बध्द व कायम स्वरुपी पर्यावरण पूरक विकास यापुढेही होईल याची खात्री देतो.
विकासाचा हा जगन्नाथाचा रथ आपल्या सर्वांच्या मदतीने मी पुढे घेवून जात आहे. आपला परिसर विकासच्या दृष्टिने सर्वोत्तम करण्याचा आपल्या सर्वांचाच निर्धार आहे. हा निर्धार प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण पुन्हा एकदा २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्या सर्वांचे मतदान रुपी आशिर्वाद आणि प्रेम सदैव माझ्या पाठीशी असेच राहु द्या आणि पुन्हा एकदा विश्वास ठेवा आणि या विकासाला पूर्णत्व देण्यासाठी पुन्हा एकदा भरभरुन साथ द्या ! हि या निमित्ताने नम्रतेची विनंती.
नाते विश्वासाचे... उद्दिष्ट विकासाचे...!
विकासकामे
पुण्याच्या सौंदर्यात भर घालणारे 'गुलाब उद्यान' झोपडपट्टी वासियांचे झाले पुनर्वसन...
मोकळी 'मैदान' मोकळी मनं... आम्ही बनवले जे मुलांना हवं...
थकलेल्या मनांना मिळणार विसावा तळजाईवर उभारल्या बैठक व्यवस्था!
तळजाई टेकडीवर स्वच्छतागृह बांधली ज्येष्ठ नागरीकांची गैरसोय टळली...
पर्यावरण रक्षणासाठी केले अनेक ठिकाणी 'वृक्षारोपण'...
प्रभागातील ७० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत कार्ड.
दक्षिण पुण्याची सांस्कृतिक ओळख लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक व नाट्यगृह...
प्रभागातील महिला बचत गटाच्या व्यावसायिक प्रगतीसाठी उद्योग भरारी प्रदर्शन...
प्रभागातील महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले.